अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत अंबड .गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.भाववाढीच्या प्रतीक्षेत तळणीसह परिसरातील शेतकऱ्यांनी शेतमालाची साठवणूक केली आहे. दरवर्षी शेतमाल घरात येताच, बाजारात
कर्ज परतफेडीचे प्रमाण घटले
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती, महाआघाडीने पीक कर्जमाफीची घोषणा केली होती. नवीन सरकार स्थापन होऊन बराच कालावधी लोटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. आगामी काळात कर्जमाफी होईल. या अपेक्षेने खरीप हंगामातील थकीत कर्ज बँकेत भरण्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
१८६ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी दोन वर्षात संपले जीवन
दर कोसळतात. तसेच नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी बाळासाहेब राऊत, प्रभुसिंग चव्हाण व अशोक राठोड यांनी केली आहे.
%20(1).jpeg)




Social Plugin