Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे यांनी घेतली अंबडमधील बेपत्ता झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट



अंबड/प्रतिनिधी मयुर वाव्हळ- 

शहरातील फैसलाबाद कॉलनीतील शेख अमजद हाजी यांची ३ वर्षीय मुलगी इकरा ही १२ जानेवारी रोजी खेळण्यासाठी घराबाहेर गेली मात्र ती परत घरी आलीच नाही. कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही. दरम्यान आज बुधवारी (ता. १५) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी इकरा शेख हीच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

शेख अमजद हाजी हे तारा बँगल्स हे बांगड्याचे दूकान चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांना अंजार अमजद शेख (वय ९ वर्ष) व इकरा अमजद शेख (वय ३ वर्ष) असे २ अपत्य आहे. १२ जानेवारी रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी इकरा ही जेवण करून बाहेर खेळायला गेली. ती घरी परत आलीच नाही. तीचा आजूबाजूला शोध घेतला असता ती सापडली नाही. तीला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी अमीष दाखवुन फुस लावुन पळवुन नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वतः पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी अंबडला येऊन मुलीच्या घर परिसराची पाहणी केली. तसेच ३-४ वेगवेगळे पथक करुन तपासाकामी रवाना केले. मात्र ३ दिवस लोटूनही मुलीचा काहीच मागमूस लागला नाही.

दरम्यान, आज दुपारी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी इकरा शेख हीच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्याकडुन घटनेची माहितीही जाणून घेतली तसेच या प्रकरणी आपण एसपी यांच्याशी बोललो असून तपास गतीने होतोय. वेगवेगळे पथक तपास कामाला लागलेले आहेत, लवकरच याचा तपास लागेल. तुम्ही काळजी कक्षल नका, थोडा धीर धरा असेही सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान मनोज जरांगे यांच्या शेख कुटुंबियांच्या भेटीनंतर पोलीस खात्याची यंत्रणा आणखी जास्तच सतर्क झाली असून, दुपारनंतर उपविभागीय पो- लीस अधिकारी विशाल खांबे यांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, अंबडचे पोलिस निरीक्षक सतिष जाधव यांच्याशी चर्चा करून आपल्या तपास पथकाला आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले.