Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे स्नेहसंमेलन सुरुवात



प्रतिनिधी रामेश्वर तोंडे लोणी गवळी

दिनांक 11 12 व 13 राष्ट्रमाता जिजाऊ माॅ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळ नवघरे  संमेलन सुरुवात होत आहे.

      या कार्यक्रमाला दिनांक 11 ला उ चिखलीचे आमदार सौ श्वेता ताई  महाले पाटील (अध्यक्ष)व विद्या श्री विद्याधरजी महाले पाटील (महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव) उद्घाटक म्हणून यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी माननीय श्री आशिषजी पवार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा) माननीय श्री बाळासाहेब खरात (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा) व मा श्री निखिलजी निर्मळ (ठाणेदार पोलीस स्टेशन अमडापुर) उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात वेळ दुपारी एक ते पाच मध्ये आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी रांगोळी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आयोजन करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  प्राचार्य माननीय श्री गाडेकर गुरुजी, शिक्षक व पालक परिश्रम घेत आहेत.