संदीप गावडे, प्रतिनिधी
आष्टा शहरातील सोमलिंग तलाव सुशोभीकरणाचे काम सुरु असून त्या कामात काहीजण आडकाठी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींना भीक न घालता सोमलिंग तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. अशी मागणी दलित महासंघ वायदंडे गटाच्या वतीने आष्टा अप्पर तहसीलदार तसेच आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनाने केली आहे.
आष्टा शहरात गेल्या एक दोन वर्षांमध्ये अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे जनतेत समाधानाचे वातावरण आहे. त्याच पद्धतीने बहुचर्चित सोमलिंग तलाव सुशोभीकरण करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. सोमलिंग तलावाच्या सुशोभीकरणामुळे आष्टा शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून ते शहरातील एकमेव प्रेक्षणीय स्थळ ठरणार आहे. त्यामुळे त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
पण काही प्रवृत्तींना अशी विकास कामे होत असलेली पाहवत नाही. त्यामध्ये मुद्दाम आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील जनता सुज्ञ असून अशा प्रवृत्तींना येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवून देईल. शहरात होत असलेला विकास हा झालाच पाहिजे. जर या कामात कोणी आडवे येत असेल, आंदोलनाची भाषा करत असेल, तर त्याला त्याच भाषेत प्रतिआंदोलन उभे करून उत्तर दिले जाईल. असा इशारादेखील दलित महासंघ वायदंडे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
सोमलिंग तलावाच्या कामाच्या विकासाच्या आडवे येण्याचे काम जर कोणी करत असेल तर प्रशासनाच्या पाठीमागे राज्य अध्यक्ष सुधाकर वायदंडे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली दलित महासंघ ही संघटना पूर्णपणे उभी राहणार आहे.
यावेळी दलित महासंघाचे आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे, महेश आष्टेकर, अक्षय औघडे, संतोष कुरणे, सचिन घस्ते, अतुल वारे, चंदर औघडे, करण कांबळे, रोहित औघडे, बंडा कुरणे, नागेश घस्ते , राहुल थोरात तसेच टायगर ग्रुप आष्टा शहराध्यक्ष महेश चोपडे, उपाध्यक्ष किशोर पाटोळे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin