अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
रेवळगाव.
अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील संपदा सुभाष येसलोटे हिची ठाणे पोलिसमध्ये निवड झाली. या यशाबद्दल तिची अंबड पंचक्रोशी मधे कौतुक होत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संपदा हिने जिद्द, चिकाटी आणि संघर्ष करत यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे रेवलगावमध्ये कसलीही सुविधा नाही. पहिली ते चौथीपर्यंत शाळा. त्यातही दोनच शिक्षक असतात. त्यानंतर पुढील शिक्षणसाठी सात किलोमीटर सुखापुरीला पायी जावे लागते. बसची सुविधा नाही. अशा संघर्षावर मात करत वर्षाने यश मिळवले. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अत्यंत कमी वयात हे यश तीनी साध्य केले आहे..





Social Plugin