Ticker

6/recent/ticker-posts

मालेगांव दिगंबर जैन मंदिर येथे कल्याण मंदिर विधान कार्यक्रम



मालेगांव प्रतिनिधी :-जावेद भवानीवाले 

 मालेगांव येथील श्री ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे दि १९ जानेवारी रोजी आचार्य श्री १०८ समयसागर महाराज जी यांचे परमप्रभावक निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ विरसागर सागर जी महाराज , मुनीश्री १०८ सुपार्श्वसागर जी महाराज , ऐलक श्री १०५ सिद्धांत सागर जी महाराज व विधानाचार्य पंडित बा.ब्र. अजय भैय्याजी यांच्या सानिध्यात दिगंबर जैन मंदिरामध्ये जीर्णोद्धाराची नविन वेदी शुद्धी व कमलासन करण्यात आले श्री १००८ ऋषभनाथ भगवान व श्री १००८ सहस्रफनी पार्श्वनाथ भगवान यांच्या नविन प्रतिमा ना उच्चाशन स्थान स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता घटयात्रा काढण्यात आली .

 ८ वाजता विधानाला सुरुवात झाली , ९.३० वाजता मुनीश्री १०८ सुपार्श्वसागरजी महाराज यांचे प्रवचन केले त्यानंतर १०.३० वाजता महाराजजींनी आहार चर्चा झाली ११ वाजता प्रतिमा ना उच्चाशन येथे विराजमान करण्यासाठी आठ बोली करण्यात आली १) अंचलयंत्र २) रजत स्वास्तिक ३) पंचरत्न ४) पारा .इत्यादी बोली घेणाऱ्या भक्तांची नांवे राजु रत्नकुमार टिकाईत , प्रियंका अक्षय रवणे , शोभा पदमसा गोरे , अक्षय दिपक टिकाईत , नंदु हिरासा कान्हेड , निधिष पंकज कान्हेड ,ध्येय धिरज कान्हेड या सर्वांनी घेवून पुण्य लाभ करण्यात आले आहे यानंतर प्रतिमा ला उच्चासन स्थान वर विराजमान करण्यात आले यावेळी सर्व दिगबर जैन पुरुष वर्ग / नवयुवक मंडळ / महिला वर्ग / नवयुवती मंडळ हजारो च्या संख्येने उपस्थिती होते