Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव शाखेत गोल्ड लोन सुविधा सुरू



मालेगांव प्रतिनिधी जावेद भवानीवाले 

     मालेगाव : दि  29/जाने 2025 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मालेगाव मुख्य शाखेमध्ये शेतकरी पगारदार व इतर ग्राहका करिता सोने तारण कर्ज सुविधा दिनांक 27 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

      सदर सुविधा उपलब्ध होण्याकरिता परिसरातील ग्राहकांनी व अनिल जाधव यांनी बँकेचे अध्यक्ष माननीय डॉ संतोष कुमार कोरपे यांच्याकडे मागणी केली होती. सदर सुविधेमुळे ग्राहकांच्या तात्कालीक गरजा भागविणे सोयीस्कर झाले आहे. सदर सुविधा उपलब्ध होण्याकरिता माननीय संचालक दिलीप जाधव यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांना ही सुविधा कमीत कमी व्याजदरावर तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सदर योजनेचा परिसरातील ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्यात आले आहे.

   काही दिवसांपूर्वी अकोला वाशिम जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ संतोष दादा कोरपे , व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैध याच्या कडे आपल्या शाखेत शेतकर्‍यां सह इतर खातेदारांना सोने तारण कर्ज योजना (सुविधा) उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी अमानी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अकोला व वाशिम सहकारी बोर्ड चे संचालक अनिल जाधव यांनी लेखी निवेदन द्वारे मागणी केली होती, ही सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गाने डॉ कोरपे यांचे आभार मानत असुन शाखेत प्रथम कर्ज घेणारे मानकरी जाधव ठरले असे शाखेचे व्यवस्थापक दत्तराव चौधरी यांनी सांगितले.