Ticker

6/recent/ticker-posts

बालेवाडीचा चेतक कबड्डी संघ ठरला सेवागिरी चषकाचा मानकरी



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

    प पु श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात बालेवाडीचा चेतक कबड्डी संघ  सेवागिरी चषकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेत २१ संघांनी सहभाग घेतला . प्रो कबड्डी, खेलो इंडिया तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सेवागिरी स्पोर्ट्स अकॅडमीचे अरुण मदने व आजी - माजी खेळाडू तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ सुरेश जाधव माजी चेअरमन रणधीर जाधव व बाळासाहेब जाधव, विश्वस्त संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

          या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात बालेवाडी संघाने ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व श्री सेवागिरी चषक पटकावला .उपविजेत्या चदुकाका जगताप प्रतिष्ठान सासवड संघाला  चषक व ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांक पै सचिनभाऊ दोडके प्रतिष्ठान बाणेर  संघाला २१ हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक सांगलीच्या जय मातृभुमी  संघाला चषक व ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. या स्पर्धेत बेस्ट रेडर शुभम गायकवाड  , बेस्ट डिफेंडर ओंकार इंजल, मॅन ऑफ द मॅच आशिष पाडाळे तर मॅन ऑफ दी  सिरीज समीर ढोकळे हे खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले. 

दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन मठाधिपती,देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशनचे कार्यवाहक बापुराव चांदेरे, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर सातारा जिल्हाध्यक्ष निलेश महाडीक सचिव प्रणव लेवे यांच्या हस्ते झाले.