बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा महोत्सवात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या युवा महोत्सवात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोककलेचे दर्शन घडविले. एकूण पाच कला प्रकारांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपली कला सादर केली. यामध्ये लोक नृत्य लाईव्ह प्रकारांमध्ये कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. महोत्सव कला प्रकारातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ सेवागिरी ट्रस्टचे मठाधिपती १०८ प.पू.श्रीमहंत सुंदरगिरी महाराज श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, माजी चेअरमन श्री .रणधीर जाधव व श्री .संतोष जाधव, विश्वस्त श्री. संतोष वाघ, श्री. सचिन देशमुख, श्री. गौरव जाधव, बाळासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण व युवा महोत्सव संयोजन समितीचे सचिव प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .श्रीमती मनोजा सोनार, प्रा.एल.के. पवार, प्रा. प्रदीप गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला.





Social Plugin