Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांचा भूमिगत प्रचार सुरू


भाऊ की ताई रिंगणात उतरणार ? नागरिकांमध्ये जोरदार चर्चेला वेगवेगळ्या

प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

मेहकरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावांची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत असून, निवडणुकीच्या रिंगणात भाऊ उतरणार की ताई ? असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला असून त्यावर जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. मेहकर नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिन्यांमध्ये होण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी मागील दीड ते दोन महिन्यापासून भूमिगत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. हा प्रचार इतका टोकाला जाऊन पोहोचला आहे की, मीडियाच्या लोकांशी संपर्क न करता सरळ मतदाराच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यास इच्छुकांनी सुरुवात केल्याचे बोलल्या जातात. या प्रचारामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला सोबत न घेता वैयक्तिक स्वरूपाच्या नागरिकांच्या भेटी घेण्यास उमेदवारांनी भर दिल्याची समजते.

मेहकर नगराध्यक्षाच्या चर्चेतील यादीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून ज्येष्ठ आणि तरुण उमेदवारांची नावे समोर येतांना दिसत आहेत. इच्छुक नगराध्यक्षपदाच्या यादीतील नावांमध्ये काँग्रेस पक्षाकडून विलासराव चनखोरे, शिवसेना (ऊबाठा ) गटाकडून युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते किशोर गारोळे, माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून पाटलाचा वाडा या हॉटेलचे संचालक गजानन गारोळे, भाजपाकडून युवा नेते इंजिनिअर सारंग माळेकर यांच्या नावाची चर्चा आहे. नगराध्यक्षासाठी असलेला प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यासोबत आणि थेट जनतेच्या संपर्कामध्ये असल्याचे दिसत आहे.

लग्न समारंभ, रक्षा विसर्जन, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमामध्ये इच्छुक उमेदवारांची उपस्थिती आणि त्यांचे स्मित हास्य हे भूमिगत प्रचाराला सुरुवात झाल्याचे दर्शविणारे आहे.