Ticker

6/recent/ticker-posts

महिला तक्रार निवारण कक्षाच्या सदस्य पदी प्रियाताई पाठक यांची निवड

   


मालेगाव  प्रतिनिधी  जावेद धन्नू भवानीवाले 

मालेगाव..महिला दक्षता समिती महिला तक्रार निवारण कक्ष वाशिम सदस्यपदी मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रियाताई पाठक यांची निवड जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी नियुक्तीपत्र द्वारे केली आहे

मालेगाव तालुक्यातील महिला. प्रियाताई पाठक या सामाजिक कार्यात 2007पासून अग्रेसर असून त्यांनी आतापर्यंत 2 हजार महिलांना न्याय मिळवून दिल्याचे काम केले. त्या विधीसेवा मंडळाचे सदस्य असून लोकन्यायालयामध्ये सुद्धा सहभागी असतात. त्यांनी उमेद महिला बचत गटामार्फत 2 ते 3 हजार महिलांना कर्ज मिळून देऊन रोजगार प्राप्त करून दिला आहे. तालुक्यातील महिलांची कुठलीही अडचण असली. प्रियाताई पाठक तिथे हजर असतात म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल असे प्रियाताई पाठक यांचे सामाजिक कार्य आहे. ताईंचे कार्य पाहून आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना वाशिम जिल्ह्याच्या महिला तक्रार निवारण कक्षाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली.