Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव येथे १८० रुग्णांची मोफत नेत्र चिकित्सा शिबीर



कृष्णा पवार@ग्रामीण प्रतिनिधी नाशिक 

सुरगाणा- सत्यसाई सेवा संघटना नाशिक व तुलसी आय हॉस्पिटल, श्री सत्य साई संघटना, बोरगाव येथील ओम साई ग्रामीण आदिवासी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ३०) बोरगाव येथील सांस्कृतिक भवन येथे नेत्रतपासणी शिबिर झाले. यावेळी १८० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मेश वैद्य हे होते. याप्रसंगी पी. एक. रंगनाथन, उद्य वाणी, प्रकाश परदेशी, गुणवंत कोतकर, सतिष वाणी व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिरात १८० रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. यातील ४० जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रीया नाशिक येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल डॉ. तुषार भाकरे, गोविंद माने, विनोद धोंगडे, ज्ञानेश्वर कदम यांनी नेत्र तपासणी केली. तसेच डॉ. तुषार भाकरे यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोतीबिंदू व डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व उपचार याविषयी माहिती दिली.

नेत्र तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी अशोक आहेर, पवन आहेर, संतोष भोये, रामदास बागुल, अशोक भोये, हिरामण पवार, गणेश कवर, दिपक भोये यांनी परिश्रम घेतले. हि संस्था विविध ठिकाणी काम करत असून जवळपास दहा महिन्यांत १२०० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.