Ticker

6/recent/ticker-posts

विभागीय उपयुक्त्यांची नैसर्गिक शेती प्रकल्पाला भेट



प्रतिनिधी संजय भरदुक मंपिर

आज दिनांक 03/01/25 वेळ.12:00 कृषि प्रतिनिधी . ग्राम गायवळ येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे आयडॉल शेतकरी व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पला आज विभागीय उपायुक्त श्री ठोंबरे साहेब यांनी त्यांच्या टीमसह भेट दिली यावेळी कारंजा तालुका कृषी अधिकारी भोसले मॅडम तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री गुणवंत ढोकणे कृषी सहाय्यक मंगेश सोळंके ग्रामसेवक श्री राठोड साहेब ग्राम रोजगार सेवक राजु गायकवाड व अन्य अधिकाऱ्यासह ग्राम गायवळ येथील नैसर्गिक शेती प्रकल्प ला भेट देऊन सदर प्रकल्पा मधील बायो इनपुट लॅब मध्ये निर्मित होणाऱ्या विविध जिवाणू ट्रायकोडर्मा मित्र बुरशी , रायझोबियम, मायक्रोरायजा आधी जिवाणूची पाहणी केली तसेच रवींद्र गायकवाड यांनी साकारलेली रोज पैसे देणारी शेती संकल्पना यामध्ये देशी गोपालन बायोगॅस निर्मिती गांडूळ खत निर्मिती व संगोपन मधुमक्षिका पालन देशी कुक्कुटपालन व कडकनाथ कुकूटपालन परसबाग वीहर पुनर्भरण पारंपारिक ऊर्जा स्त्रोत सोलर युनिट रोपवाटिका आदी विविध घटकांची विभागीय उपायुक्त ठोंबरे साहेब सह टीमने पाहणी केली तसेच विभागीय उपायुक्त श्री निलेश ठोंबरे साहेब यांनी विविध विषयावरती सखोल मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी भोसले मॅडम यांनी सुद्धा नैसर्गिक शेती संकल्पना याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व रवींद्र गायकवाड यांचे अभिनंदन केले प्रक्षेत्र भेट कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाळण्याकरता डॉ. पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती व शेत बांधावरील प्रयोगशाळेच्या कर्मचारी सौ भाग्यश्री गायकवाड, सौ नीता इंगळे, काशिनाथ लोखंडे श्री मस्के, सौ .सविता इंगळे आदींनी परिश्रम घेतले ............. असे असल्याचे ग्रामीण कृषि प्रतिनिधी यांनी कळविले