Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथील तलाठी कार्यालय कार्यालयीन वेळेत बंद का?: जावेद धन्नू भवानीवाले यांचा सवाल



(मालेगाव. प्रतिनिधी)

मेडशी : दि:03 जाने 2025 रोजी काही शासकीय कामानिमित्त गेल्यास मेडशी तलाठी कार्यालय हे कार्यालयीन वेळेत दुपारी 03:45 वाजता बंद स्थितीत आढळून आले. तलाठी कार्यालयात कोणतेही अधिकारी उपस्थित नसताना कोणाशी संपर्क साधावा, कार्यालयीन वेळे आधीच कार्यालय कसे बंद झाले.महसूल विभागाने कार्यालयीन वेळेत बदल करून कार्यालयीन वेळ कमी केले आहे काय. बंद असलेल्या तलाठी कार्यालयाशी महसूल व शेती विषयक असलेली कागदपत्रांची मागणी कशी करावी. 

कुठलीही सूचना नाही येथे कार्यालयीन वेळेचे फलक नाही. अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल असे कुठलेच ध्वनी क्रमांक व हेल्पलाइन सुविधा उपलब्ध नाही महसूल व शेती विषयक असलेली कामे परिसरातील नागरिकांनी कशी करावी अशी चिंता व नाराजी व्यक्त करत.आहेतकार्यालयीन वेळे आधीच अधिकारी व इतर कर्मचारी कुठ पसार झाले. या महत्त्वाच्या बाबी कडे वरिष्ठ महसूल प्रशासकीय यंत्रणेने आपले लक्ष देणे खूप गरजेचे आहे अशी मागणी मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांच्याकडून प्रशासनाला होत आहे.