प्रतिनिधी:- अशोक ढाकणे
दिनांक :- नूतन माध्यमिक विद्यालय जूनियर कॉलेज किनगाव राजा येथे शारदा साहित्य मंडळ अंतर्गत आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बीबी शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी विधी विनोद माळोदे हिने प्रथम तर कुमारी संस्कृती विजय देशमुख यांनी द्वितीय क्रमांक पटकावला समाजातील ज्वलंत प्रश्नावर देशात चालू असलेल्या घडामोडीवर प्रकाश टाकण्याचे काम या स्पर्धेतून नेहमी केल्या जाते आतापर्यंत 120 पेक्षा जास्त विषयावर या महाविद्यालयाने स्पर्धेचे आयोजन केले आहे त्यात यावर्षी माझे संविधान माझा अभिमान व स्त्री सक्षमीकरण काळाची गरज या दोन विषय ठेवण्यात आले होते.
माझे संविधान माझा अभिमान विषयावर कुमारी विधी माळोदेने आपले विचार प्रकट केले तर स्त्री सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर कुमारी संस्कृती देशमुख हिने आपले प्रभावी मत मांडले व प्रत्येकी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला 55 वर्षाची वकृत स्पर्धेची परंपरा असलेल्या या शाळा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांतील वक्ता जिवंत ठेवण्याची परंपरा आजतागायत कायम ठेवली असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेची शिक्षक अशोक ढाकणे व गीतांजली माळोदे यांनी केले विद्यार्थिनीच्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री भाईजी व सौ कोमल मॅडम , सूकेशजी झवर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले





Social Plugin