Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हेरपाडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

 


कृष्णा पवार@ ग्रामीण प्रतिनिधी नाशिक 

      दिंडोरी - परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया व ग्रुप ग्रामपंचायत कोल्हेरपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर वार शुक्रवार दिनांक 24/01/2025 या दिवशी आयोजित करण्यात आले होते .सदर शिबिरामध्ये 73 नागरिकांनी मोफत डोळ्यांची तपासणी करून घेतली .या प्रसंगी ग्रामपंचायत कोल्हेर येथील सरपंच नैनाताई भरसट,पोलीस पाटील राजेंद्र गायकवाड आणि रोजगार सेवक मोहन कवर आशा सेविका प्रमिला पालवी आणि संगीता गवळी अंगणवाडी सेविका चंद्रकला कवर यांचे विशेष सहकार्य लाभले .

       यावेळी चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया (दिंडोरी) या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ.अमोल येवला ,फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे,आरोग्य शिक्षक तुषार साबळे व महिमा सोनवणे,डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड, देविदास निकम व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथील ऑप्टोमेट्रिस्ट गोविंद माने आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.