बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] -
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत सातारा जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर पुसेगाव या शाळेने सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली आहे .
याबद्दल पुसेगाव चे उपसरपंच विशाल जाधव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल जाधव व सदस्य यांनी बालकलाकार व शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून अभिनंदन केले .'जंक फुड खाणे टाळा व आरोग्य संभाळा' हे बालनाट्य शाळेतील उपशिक्षिका श्रीमती सावंत प्रतिमा गोरखनाथ यांनी स्वलिखित बसवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रत्येक वेळी नवीन विषय घेऊन बालनाट्यच्या माध्यमातून मुलांचे व समाजाचे प्रबोधन करण्याचे बालकलाकारांनी प्रयत्न केले.त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपसरपंच यांनी श्रीमती प्रतिमा सावंत यांचा सत्कार व अभिनंदन केले.तसेच जि.प.कर्मचारी स्पर्धेत 400 मीटर धावणे स्पर्धेत उपशिक्षक रवींद्र ननावरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . तसेच उपशिक्षक सुभाष नाळे व वैशाली नाळे उपशिक्षिका यांनी क्रीडा संचलनात बंगाली वेशभूषा केली होती.त्यामध्ये खटाव तालुक्याचा प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार व अभिनंदन केले.या शाळेतील सहशिक्षिका प्रमिला मंगेश घाडगे,आशा रमेश भोसले,वर्षा जनार्धन सुर्यवंशी,शिवाजी सावता गोरे,सोमनाथ मारुती पाटोळे यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले व शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र सखाराम कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेत विद्यार्थी यांनी उज्वल यश मिळवले.त्याबद्दल सर्वांचा मान्यवरांनी सत्कार केला.बालनाटय स्पर्धेत सहभागी बालकलाकार सृजना भगवान सरवदे , हर्षुल पंकज घनवट , विघ्नेश विशाल जाधव ,सानवी नवनाथ घाडगे , अक्षरा आदित्य चव्हाण ,शिवन्या गिरीधर पाचपुते , इंद्रनील उमेश गायकवाड , अद्वैत गणेश तारळकर , श्रवण संदीप फडतरे या विद्यार्थांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मान्यवरांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सोमनाथ पाटोळे सर यांनी केले तर आभार शिवाजी गोरे सर यांनी मानले .





Social Plugin