अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
मंडळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एसटी म्हणजे केवळ एक परिवहन सेवा नाही, तर ती लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळपासून ते रात्रीच्या शेवटच्या बसपर्यंत, एसटीच्या सोबतीने अनेकांचे दिवस सुरू होतात. वेळेवर न येणाऱ्या बसांमुळे प्रवाशांना ताटकळत थांबावं लागते, ज्यामुळे वेळ वाया जातो आणि वैतागही होतो. ही समस्या लक्षात घेत, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांना एसटी बसची अचूक माहिती मोबाईलवर मिळू शकते.
ग्रामीण महाराष्ट्रात एसटी बस ही लोकांच्या दळणवळणाची मुख्य कडी आहे. ती कामगार, विद्यार्थी, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि परवडणारे माध्यम आहे. एसटीच्या वेळेत न येण्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम काय आहे?
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (VTS) ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या मदतीने, प्रवाशांना त्यांच्या एसटी बसचे स्थान थेट मोबाईलवर कळेल. प्रवाशांना कधी आणि कुठे बस पोहोचेल याची माहिती आधीच मिळेल, ज्यामुळे त्यांना बसची वाट पाहण्यासाठी वेळ वाया घालवावा लागणार नाही.
.jpeg)




Social Plugin