बुध दि .[प्रकाश राजेघाटगे
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वर्धनगड येथे बालबाजार आणि फूड फेस्टिवलचे तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बालबाजाराचे उद्घाटन वर्धनगड केंद्राचे .केंद्रप्रमुख श्री नवनाथजी गावडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य ग्रामस्थ महिला पालक आणि शिक्षण प्रेमी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भाजीपाला स्टाॅल विविध फूड स्टॉल लावलेले होते. बालबाजारात एकूण १८१५३/- अठरा हजार एकशे त्रेपन्न रुपयांची उलाढाल झाली. या बालबाजाराच्या उपक्रमातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात केलेले दिसून आले.
आजच्या या बालबाजारास वर्धनगड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.नवनाथजी गावडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ महिला पालक आपण सर्वांनी बालबाजारास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केल्याबद्दल उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वर्धनगड यांच्या वतीने आभार मानले.





Social Plugin