Ticker

6/recent/ticker-posts

संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त संताजी कॉन्व्हेंट मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा व आनंद मेळाव्याचे आयोजन



आज दिनांक 01/01/2025 संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व नववर्षाचे निमित्य साधून संताजी कॉन्व्हेंट मध्ये इयत्ता नर्सरी ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते या सोहळ्यामध्ये भरघोस विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला लहान लहान चिमुकले विविध प्रकारच्या वेशभूषा धारण करून मंचकावर आल्या बोबड्या शब्दात त्यांनी आपल्या वेशभूषेला साज दिला आनंद मेळाव्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पदार्थांचे दुकाने लावली व इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा पदार्थांच्या खरेदीसाठी उत्साह दर्शविला या  सर्व विद्यार्थ्यांचे संताजी कॉन्व्हेंट सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य राजबिंडे मॅडम, उपप्राचार्य डोंगरे सर व शिक्षक वर्ग यांनी कौतुक केले