Ticker

6/recent/ticker-posts

ननाशीत पिता-पुत्राकडून शेजाऱ्याचा खून



ग्रामीण प्रतिनिधी नाशिक (दिंडोरी)

दिंडोरी : नववर्षाच्या पहिल्याच  दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे दाक्षिणात्य सिनेमा स्टाईलने पिता-पुत्राने शेजाऱ्याचे शीर कुऱ्हाड, कोयत्याने धडावेगळे करत शीर व कुऱ्हाड घेऊन पोलिस स्टेशनमध्ये हजर - झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.मागील दोन वर्षांपूर्वी मुलीचे लग्न मोडण्यास व आता मुलगी सासरहून बेपत्ता झाली यास शेजारी जबाबदार असल्याच्यासंशयावरून वाद होता. यातून हा खून झाल्याची चर्चा असून, पोलिस तपास करत आहेत.

 याबाबत मिळालेली माहिती अशी की, ननाशी येथील गुलाब रामचंद्र वाघमारे व सुरेश बोके हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात दोन वर्षांपासून मुलीचे ठरलेले लग्न मोडले यावरून वाद होता. यानंतर मुलगी सासरहून बेपत्ता झाली. या सर्व प्रकरणात शेजारी राहणारे गुलाब हेच जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके यांना होता. यावरून त्यांच्यात ३१ डिसेंबरला वाद झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व जण नववर्षाचे स्वागत अन शुभेच्छा देत असताना वाघमारे व बोके यांच्यातील वाद उफाळून आला. यावेळी सुरेश बोके व त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी कुऱ्हाड व कोयत्याने गुलाब वाघमारे यांच्या मानेवर हल्ला करत शीर धडा वेगळे केले अन् कुऱ्हाडीसह शीर घेऊन पोलिस औट पोस्ट गाठले.