.यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर
नवीन वर्षानिमित्त 2 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान पुणे येथे पहिला आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव साजरा करण्यात येणार आहे .क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा यांनी ज्या भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली , तेथे आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत या महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे विजय वडगाव यांनी सांगितलेया महोत्सवात पुण्यातील नवी पेठ येथे असलेल्या एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सलग चार दिवस महाराष्ट्रासह देश-विदेशातील कवींना काव्य जागर कार्यक्रम साठी निमंत्रित करण्यात आले आहे .
सदरील कार्यक्रमात आपल्या कन्नड तालुक्यातील रामनगर येथील जेष्ठ पत्रकार दत्ता मोरस्कर आणि पिशोर येथील समता विद्यालयाचे शिक्षक नाना लहाणे यांची निवड करण्यात आली आहे .या निवडीबद्दल दत्ता मोरस्कर आणि नाना लहाने यांची कन्नड येथील जयकाली सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.





Social Plugin