Ticker

6/recent/ticker-posts

कटचिंचोली ते दैठण ४ किमी साठी 'साडे चार कोटी रुपये' बजेट असुनही रस्त्यावर मात्र वापरला जातो माती मुरूम .


तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/गेवराई

गेवराई (बीड):- ता ०५/ रविवार गेवराई तालुक्यातील कटचिंचोली चा तब्बल २५/२६ वर्षांनंतर माजी आमदार लक्ष्मण (अण्णा)पवार यांनी कटचिंचोली ते दैठण ४किमी अंतराचा रस्ता तब्बल २५/२६ वर्षांनंतर मंजूर करून आणला व त्याचे उद्घाटन शिवराज पवार यांच्या हस्ते झाले. काम पन सुरू झाले परतु सत्ता बदल झाली.

 आणि कोणी लक्ष हि देईना!रस्त्याचे काम सुरू असताना पिचिंग करण्यासाठी कंट्राक्शन कडुन 'माती मुरूम' वापरला जातो.याकडे कोणाचेचं लक्ष नाही.इंजिनियरचं पन लक्ष नाही. रस्त्यावर टाकलेल्या माती मुरमावर पाणी मारलं असता त्यामुळे,मोटर सायकल जाम होऊ लागल्या आणि.त्या रस्त्यावरुन वाहने घसरु लागले आहेत.

  त्यामुळे गावकऱ्यांचे म्हणने आहे की,या रस्त्याकडे,माजी किंवा आजी आमदारांनी लक्ष द्यावे व रोडवरती टाकलेल्या मुरमाची पाहणी करावी व मुरुम चांगला टाकुन घ्यावा!.