प्रतिनिधी शौकत शेख
गायकवाड जळगाव- सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवसे पाटलाच्या कुटुंबात झाला बालपणापासून त्या फार जिज्ञासु होत्या 1840 साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला ज्योतीराव फुले यांनी तत्कालीन अनिष्ट प्रथा नाकारून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले फुलेंनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःचा कुटुंबापासून केली आहे या कार्याला जोतीराव याचे वडिलांचा विरोध होता ज्योतीराव फुले यांनी घर सोडले पण शिक्षण द्यायचे कार्य सोडले नाही फुलेंनी पहिले शाळा 1 व जानेवारी 1848 रोजी सुरू केली ही देशातील पहिली सार्वजनिक आणि मोफत शाळा आहे त्या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्री फुले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी अध्यापनाचे काम केले आहे ज्ञानाचे महत्त्व सांगताना सावित्रीबाई फुले लिहितात
ज्ञान नाही, विद्या नाही,
ती घेण्याची गोडी नाही
बुद्धी असून चालत नाही
तयास मानव म्हणावे का
मानव हा बुद्धी ग्रहण करण्यास लायक आहे त्यामुळे त्यांनी ज्ञान गर्जना पाहिजे असे सावित्रीबाई फुले यांनी म्हंटले आहे





Social Plugin