Ticker

6/recent/ticker-posts

नापिकीला कंटाळून महिलेची आत्महत्या



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 


 दिग्रस : तालुक्यातील विठोली( मारुती ) येथील एका शेतकऱ्याच्या पत्नीने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 31 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. रेणुका नामदेव राठोड( वय वर्ष 67 ) राहणार विठोली असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव आहे. सततची नापिकी व सोसायटी बँकेचे कर्ज असल्याने त्या विवेचनात होत्या, अशाच त्यांनी आपल्या राहत्या घरी तीन पत्राच्या खाली असलेल्या लोखंडी यंगल ला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. 

ही बाब नातेवाईकांना माहीत होताच तात्काळ उपचारासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेहाचे शैवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक यांच्या पश्चात पती, विवाहित तीन मुले व विवाहित दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहकारी करीत आहेत.