Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 


 दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा येथे सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रतिष्ठित नागरिकांनी हरार पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेत कुमारी चैताली रमेश आंबेकर वर्ग चौथा हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून भाषण केले. तसेच अनेक मुलींनी सुद्धा वेशभूषा साकारल्या होत्या.

 भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडात वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियांबद्दल " चूल आणि मूल " ही भावना मोडीत काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. आणि स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले, आजची स्त्री कोणत्या क्षेत्रात मागे नाही स्त्रियांच्या जीवनात शैली पूर्णपणे बदलली असून महिलांच्या शिक्षणाचे दिपप्रज्वलित करणाऱ्या आणि समाज सुधारण्याची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहो असे गजानन आंबेकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते भारत मनवर, ग्रामपंचायत सदस्य शेख अख्तर शेख अमान, माजी सरपंच कुदुस खान, रोजगार सेवक रामराव मनवर, रोहित, शमशोदिन अनिकेत काळबांडे, ईक्रामोद्दीन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल राजीक, शाळेचे मुख्याध्यापक कुकडे, भाटी, अनिस शेख, दिगंबर वंडे,सागर गुजर, दिपाली निचत, तसेच गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.