पत्रकार नाव -( तुकाराम क्षीरसागर @ प्रतिनिधी)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज येथे साजरा करण्यात आला. येथील ध्वजारोहण येथील रहिवाशी माननीय श्री एडवोकेट गजेंद्र देवीचंद भन्साली भारतीय फलोदी जैन संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणास गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते. त्यात ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष श्री जीवनलाल भन्साली, पद्यनाथ सोनार, मनोज सोनार, माधव पवार, राजेंद्र भन्साळी, संदीप भन्साली, शाळेचे प्राचार्य श्री एस डी शिवदे, उपप्राचार्य आर यू वळवी, पर्यवेक्षक एम एन इंगळे, उपमुख्याध्यापक श्री आर एल थोरात, सह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी शाळेत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता त्यात लहान व मोठ्या गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले. त्यासोबत वर्षभरात विविध स्पर्धेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
.jpg)




Social Plugin