बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
संक्रांतीनिमित्त ध्यास फाउंडेशन, सातारा यांच्या माध्यमातून मा. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पुणे यांच्या आदेशाने कारागृहातील महिला बंद्यांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण निना बेदरकर या होत्या.
ध्यास फाउंडेशन यांच्या माध्यमातून 1 जानेवारी, 2025 पासून कारागृहातील महिला बंदीसाठी योग शिबिर सुरू करण्यात आलेले आहे. ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्ष वैजयंती ओतारी या दररोज कारागृहात येऊन सकाळी 7 ते 8 या वेळात महिला बंदिंना योगासन व प्राणायमचे धडे देतात.
यावेळी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती नीना बेदरकर यांनी महिला बंदींना संक्रांतीच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. तसेच महिला बंदींना ध्यास फाउंडेशन यांच्या माध्यमातून योगा मॅट व मकर संक्रांतीचे औचित्य साधून मेहंदीचे कोण अशा वस्तू भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमास न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण निना बेदरकर, ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा वैजयंती ओतारी, स्वरूपा पोरे, सदस्य, महिला व बालकल्याण समिती, सातारा, सिने अभिनेत्री कुमुदिनी अगाटे, ध्यास फाउंडेशनचे सदस्य सुप्रिया जाधव, अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार दत्ताजी भिसे, मानसिंग बागल, महिला शिपाई गीता दाभाडे, लता काळकुटे, रूपाली नलवडे, तुकाराम घुटुकडे, बालाजी मुंडे, प्रेमनाथ वाडीकर इत्यादी हजर होते.





Social Plugin