Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात संपन्न



बुध दि[प्रकाश राजेघाटगे]

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये  स्वामी विविकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्सहात संपन्न झाली . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 जानेवारी ते 19 जानेवारी या सप्ताहामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून  सरपंच सौ. सुजाता बोराटे , उपसरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे , शाळाव्यवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण प्राचार्य अंकुश भांगरे विद्यालयातील सर्व सहकारी व विद्यार्थी यानी स्वामी विवेकानंद , राजमाता जिजाऊ , डॉ बापूजी साळुंखे , व संस्था माता सुशिलादेवी सांळुखे यांना अभिवादन करून मोठ्या उत्साहामध्ये भव्य मिरवणूक ढोल ताशा गजरात बुध मधुन काढून जयंती साजरी करण्यात आली . विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने घोषणा दिल्या . मुस्कान मोमीन हिने स्वामी विवेकानंद व तन्वी पात्रेकर हिने जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा घेतला . 

तसेच सरपंच सुजाता बोराटे यांनी सप्ताहानिमित् शुभेच्छा दिल्या तसेच अभयसिंह राजाघाटगे यानी देखील त्यांच्या शालेय जीवनातील सप्ताहातील आठवणींना ऊजाळा दिला व मार्गदर्शन केले . तसेच चंद्रकांत चव्हाण  यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले व सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान केले . या स्पताहामध्ये निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , विविध खेळाच्या स्पर्धा , माता पालकांसाठी  हळदीकुंक व तिळगुळ कार्यक्रम , तसेच प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी  आयोजन करण्यात आले आहे . तसेच क क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन विद्यालयाचा माजी विद्यार्थी रविंद्र चव्हाण , चंद्रकांत चव्हाण , सरपंच सौ सुजाता बोराटे व प्राचार्य अंकुश भांगरे व सर्व शिक्षक -शिक्षीका , विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले व  उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी देखील विवेकानंद सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान सरवदे यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले .