Ticker

6/recent/ticker-posts

आ. अमित झनक यांनी घेतली वाशीम जिल्हाधिकारी व अकोला कार्यकारी अभियंता यांची भेट



 *शेगाव पालखी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी*


 मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


 मालेगाव दि 10 जाने गण गण गणात बोते च्या गजराने वाशिम जिल्ह्यातील विविध गावातून नियमित शेगावाला श्री च्या दर्शनासाठी पायदळी जाणाऱ्या भक्तांसाठी मेडशी मार्गे जाणाऱ्या शेगाव पालखी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून. पालखी घेऊन जाणाऱ्या श्रींच्या भक्तांसाठी हा मार्ग तातडीने पूर्ण करून, येण्या जाण्यासाठी मोकळा करून देण्यात यावा . पालखी रस्त्याचे विकासकाम उत्तम दर्जाचे करण्यात यावे अशा मागणी व विविध विषयावर माननीय आमदार अमित सुभाषराव झनक यांनी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस मॅडम तथा कार्यकारी अभियंता मा.प्रसाद पाटील साहेब अकोला यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित मेडशी गावचे युवा सरपंच शेख जमीर शेख गणी, मा पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे. बबलू जैन, मा.सरपंच रमजान गवरे मा.ग्रामपंचायत सदस्य समाधान तायडे,कालू गवरे ,छट्टू गवरे,मन्नान रेघीवाले, संजय भागवत, धीरज मंत्री,पांडुरंग मांडोगळे व इतर बळीराजा मित्र मंडळ मेडशी