Ticker

6/recent/ticker-posts

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्ती निमित्त आष्ट्यात आज महाआरतीचे आयोजन

 


संदिप गावडे @ प्रतिनिधी 


           आष्टा येथील श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त शनिवार दि. ११ जानेवारी २५ रोजी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आष्टा शहरातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव समिती यांनी केले आहे.

           सुमारे ५०० वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर अयोध्येमध्ये  श्रीराम जन्मभूमी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी पौष शुक्ल द्वादशी (२२ जानेवारी २०२४) रोजी देशभर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीराम प्रभूंच्या  पावनस्पर्शाने स्थापित श्री अष्टलिंगाच्या आष्टा नगरीतील श्रीराम मंदिरातही तो सोहळा उत्साहात पार पडला.

        त्याचे स्मरण म्हणून श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव समितीच्या वतीने येथील श्रीराम मंदिरात न चुकता प्रत्येक बुधवारी सायंकाळी सात वाजता श्रीरामाची साप्ताहिक आरती व आराधना याचे नियोजन वर्षभर केले. त्याचबरोबर श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ (पौष शुक्ल द्वादशी) रोजी  सायंकाळी ६ वाजता भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यासाठी समितीच्या वतीने आष्टा शहरातील प्रत्येक विभागातील गल्ली, वार्ड, प्रभागात जाऊन या महाआरती साठी निमंत्रित केले आहे. 

       त्यानुसार या भाग्याच्या व आनंदाच्या दिवशी संपूर्ण आष्टा नगरीतील श्रीराम भक्त, भाविकांनी सहकुंटुंब - सहपरिवार महाआरतीस उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव समिती यांनी केले आहे.