बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
'रक्तदान हेच जीवनदान', 'रक्तदान सर्वश्रेष्ठ दान' या जाणिवेने मित्राच्या स्मृती प्रित्यर्थ पिंपोडे बुद्रुक (ता.कोरेगाव) येथील कै. ऋषी गुरव मित्र समूह व बालाजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपोडे बुद्रुक येथे रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये ९६ युवक व ग्रामस्थांनी रक्तदान केले.
यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती संजय साळुंखे, घिगेवाडीचे सरपंच नारायण सावंत, दत्तात्रय जाधव, सागर लेंभे-पाटील, अमित लेंभे, सुनील साळुंखे, योगेश शिंदे,बालाजी ब्लड बँकेचे महेश भोसले, महेश गायकवाड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin