चोरी-लुटमारीवर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल !
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : - शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी जुना बस स्टॉप परिसरात मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत चोरी,लुटमार, पाकीटमारी,आणि महिलांच्या दागिन्यांची चोरी यांसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे एसटीमधून उतरणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास कमी करून,सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या सीसीटीव्ही कॅमेरांची स्थापना करण्यात आली आहे चौधरी यांनी मुख्य बाजारपेठ,सुवर्ण अलंकार केंद्र,व्यापारी लाईन,आणि कपडा मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांनी या चौका चौकामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे,जेणेकरून शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही असे कॅमेरे बसवता येतील सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने परिसरातील संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे,ज्यामुळे गुन्हेगारी घटनांवर वेळीच कारवाई करणे शक्य होईल या उपक्रमामुळे स्थानिक सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास वाढेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मालेगाव पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून,यामुळे चोरी-लुटमारीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मदत होणार आहे सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.





Social Plugin