प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
जि.प.हायस्कूल मंगरुळ नवघरे ता.चिखली जि.बुलढाणा दि.३/१/२०२५ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयती साजरी करण्यात आली . यामध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र्यावर प्रकाश टाकण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी भाषण केले.यामध्ये श्री गोसावी सर,श्री सरोदे सर,प्राचार्य श्री गाडेकर गुरुजी यांनी आपल्या भाषणाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.तसेच श्रेया पानगोळे हिने वैयक्तीक नृत्य, सावित्रीबाई फुलेवर साजरे केले. हे विशेष
यांमध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका या कार्यक्रमचे संचालन वर्ग ९ वी विद्यार्थी सिध्दी गाडे, श्रद्धा थेटे,भारती अंभोरे या मुलींन केले
या कार्यक्रमासाठी श्री वांजोळ सर,श्री केदारसर,श्री सुर्वे सर,श्री डहाळे सर,श्री रामेश्वर तोंडे,नेवारे मॅडम,जाधव मॅडम,भालेराव मॅडम,दाळीमकर मॅडम,उंबरकर ताई शिक्षक व विद्यार्थी हजर होते.आभार प्रदर्शन श्री वांजोळ सरांनी केले.





Social Plugin