प्रतिनिधी संजय भरदुक मंपिर
दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी ग्राम गायवळ तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत संत गाडगेबाबा सेंद्रिय शेती बचत गट व वाशिम ऑरगॅनिक मिशन महासंघ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गायवळ व ग्रामपंचायत कार्यालय गायवळ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय जलतारा मार्गदर्शन कार्यशाळा माननीय जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे जलतरा कार्यशाळे करिता उपजिल्हाधिकारी माननीय कैलास देवरे साहेब राष्ट्रीय रोजगार हमी योजना तसेच उपविभागीय कृषी अधिकारी माननीय संतोष वाळके साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे सदर कार्यशाळे करिता तालुका कृषी अधिकारी माननीय भोसले मॅडम, मंडळ कृषी अधिकारी गुणवंत ढोकणे, कृषी सहाय्यक मंगेश सोळंके तसेच ग्राम गायवळ चे कार्यकारी. सरपंच समाजसेवक सतीश पाटील राऊत व ग्राम गायवळ सह कारंजा तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत सदर कार्यशाळेमध्ये जलतारा प्रकल्प तांत्रिक मार्गदर्शन जलतरा प्रकल्पाचे फायदे आधी विषयावरती तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाणार आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा अशी आव्हान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयडॉल शेतकरी शेतीनिष्ठ WOM चे अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी केले .





Social Plugin