बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील सुरज ड्रायक्लीनर्समध्ये शामराव भोसले यांनी कपडे ड्रायक्लीनसाठी दिली होती. कपड्यांमध्ये चंद्रकांत शेडगे यांना ९१०० रुपये सापडले . सापडलेली रक्कम संबंधित व्यक्तीला शेडगे यांनी मोठ्या मनाने परत केली.
खातगुण ता. खटाव येथील शामराव गोविंद भोसले यांनी पुसेगावच्या सुरज ड्रायक्लीनर्समध्ये ड्रायक्लीनसाठी कपडे दिली होती. त्या कपड्यांमध्ये शेडगे यांना ९१०० रुपये सापडले असता त्वरित भोसले यांना मोबाईलवरून संपर्क साधून तुमचे पैसे सापडले आहेत, असे सांगून बोलवून घेतले. भोसले यांचे सापडलेले नऊ हजार शंभर रुपये माघारी परत केले.
दरम्यान, ड्रायक्लीनर्सचे सुरज संचालक चंद्रकांत शेडगे यांच्याकडे पुसेगावसह पंचक्रोशीतून कपडे ईस्त्री व ड्रायक्लीनर्ससाठी येत असतात. अनेक ग्राहकांचे अनावधानाने आलेले पैसे परत केले आहेत. तसेच एकदा दोन तोळे सापडलेले सोने सुद्धा संबंधित व्यक्तींला परत केले आहे.चंद्रकांत शेडगे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक होत आहे.





Social Plugin