Ticker

6/recent/ticker-posts

कलगाव बीट बनले जमादारासाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी'



( अनेक गावात फोफावले अवैध धंदे )

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कलगाव बीट मध्ये अनेक गावात अवैद्य धंदे मटका, गावठी दारू भट्याचा महापूर, देशी, विदेशी दारूची अवैध विक्री, जुगार सर्रास सुरू असून या अवैध धंद्यांना आता हप्ते खोरीने घेरले असून शेकडो गरीब कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहे. संबंधित बीड जमादाराच्या आश्रयाखाली राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून अनेक गावात मागील बऱ्याच दिवसापासून चोऱ्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शेतातील इलेक्ट्रिक मोटर पंप, स्प्रिंकलर तोट्या, शेतातील इतर चोऱ्यांचे प्रचंड प्रमाणात वाढल्या असल्यामुळे भांडण तंटे घटना घडत आहे.

 या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची वचक राहिलेली दिसून येत नाही. संबंधित बीट जमादाराच्या अर्थसंबंधातून तूप टाकळी, वसंतनगर, कलगाव, वरंदळी येथे मटका व्यवसाय जोमात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसून येत आहे. शिवाय अनेक गावात गावठी दारूचा महापूर आलेला असून गावातील उकिरड्यावर दारू तयार झाल्यानंतर मोह माचाचे ढिगारे तपासल्यांवर गावठी दारूची सत्यता दिसून येणार आहे. खुलेआम अवैध धंदे सुरू असण्याच्या मुखसंमतीत कलगाव बीड बनले जमादारासाठी ' सोन्याची अंडी देणारी कोंबडी ' असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अवैद्य धंदे बंद करण्याचे आदेशाबाबत क** निर्देश असताना त्यांच्या आदेशाला संबंधित जमादाराकडून केराची टोपली दाखवल्या जात असल्याची वास्तविकता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीट मध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडसतराचा कार्यक्रम राबवून अवैध धंदे बंद करावे अशी सर्वसामान्य जनतेकडून मागणी होत आहे.