Ticker

6/recent/ticker-posts

अखंड भारतीयांना न्याय मिळवून देणारा दिवस म्हणजे २६जानेवरी..ह.भ.प. डॉ तुळशीराम खोटे.



तालुका प्रतिनिधी 

मारोती गाडगे/गेवराई 


गेवराई (बीड):- दि २६/०१ रविवार कटचिंचोली जि.प.प्रा.शाळा येथे ७६वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण समिती चे अध्यक्ष श्री मारोती गाडगे हे होते.प्रमुख पाहुणे, शिक्षण समिती चे उपाध्यक्ष श्री मधुकर औटी,सरपंच रविंद्र निवारे, उपसरपंच ज्ञानेश्वर कोकणे, शिक्षक , श्री विशाल सर, श्री जोशी सर, श्री अमोल सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर सर्व शिक्षक व  ग्रामपंचायत माजी,आजी सदस्य, गावातील नागरिक होते.या वेळी ह.भ.प. डॉ तुळशीराम खोटे म्हणतात, अखंड भारतीयांना न्याय मिळवून देणारा दिवस म्हणजे २६जानेवरी होय! कारण आजच्या दिवशी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २साल,११महिने,१८दिवस  अहोरात्र मेहनत करून भारतांचे संविधान लिहिले व २६नोव्हेबर १९४९ला तयार करण्यात आले आणि ते २६जानेवारी १९५०ला भारतात लागु केले . आणि लोकांनीं लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे संविधान होय.जो पर्यंत प्रत्येक शाळेत संविधान वाचले/शिकवले जात नाही तोपर्यंत गुन्हेगारी कमी होत नाही.

  शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी सांगितले की.तसं आपलेला स्वतंत्र १५ॲगस्ट १९४७ मिळाले.परंतु खरे स्वतंत्र आपलेला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २साल ११महिने १८दिवस अहोरात्र मेहनत करून भारतांचे संविधान लिहिले आणि ते २६जानेवारी १९५० ला लाग केले तेव्हा आपनास खरे स्वतंत्र मिळाले.कारण कोणताही कारभार चालवायला संविधान लागते सर्व समाजासाठी संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला जातो .संविधान सर्वांसाठी सारखेच पन त्याला चालविणारे शासन चांगले पाहिजे.मि तर म्हणेन ज्या प्रमाणे बायबल, कुराण,गीता,या ग्रंथाप्रमाने संविधना हा सर्वात मोठा ग्रंथ आहे संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळवून दिला जातो.आज जर संविधान नसते तर आपले काय हाल झाले असते.म्हणुन आपन संविधान सर्वांनी काळजी पूर्वक वाचले , जपले पाहिजे आणि आपण आपल्या घरात संविधान ठेवले पाहिजे आणि आपल्या मुलांना संविधानाची माहिती , वाचन करून घेतले पाहिजे कायद्याची माहिती दिली पाहिजे ज्यानेकरुन लहान पानांपासून चं आपल्या मुलांना कायद्याचे ज्ञान होईल आणि गुन्हेगारी चे प्रमाण कमी होईल.तस तर शिक्षण मंत्री यांनी संविधान रोज अर्धा तास तरी शाळेत शिकवायला आदेश दिले पाहिजे.ज्याने करुन मुलांना कायद्याचे ज्ञान मिळेल.

  म्हणुन २६जानेवरी हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

 गावातील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सर्व जेष्ठ मान्यवर उपस्थित होते.व श्री अमोल सर यांनी जमलेल्या नागरीकांचे आभार मानले.