बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पालकांनी मुलांना विचारांचा जागर द्यायला हवा .संस्काराचा वारसा द्यायला हवा. संतांच्या व विचारवंतांच्या विचारावर आपण मार्गक्रमण केल्यास अडचणी येत नाहीत. महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन मोठी कार्य करा, चांगल्या गोष्टी करा .आई-वडिलांना आदर्श माना. त्यांची वृद्धापकाळाची काठी बनून रहा. शालेय परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हाल ,पण आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
असे मत प्रसिद्ध प्रबोधनकार व कीर्तनकार श्री प्रथमेश इंदुलकर यांनी श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल जुनियर कॉलेज एच. एस. सी. व्होकेशनल व तांत्रिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व इयत्ता दहावी बारावी विद्यार्थी शुभचिंतन कार्यक्रम प्रसंगी काढले .
कार्यक्रमास कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, विश्वस्त डॉ. सुभाष आगाशे, विश्वस्त श्री सुभाषराव जाधव , श्री योगेशराव देशमुख , श्री एस. आर .पाटील ,संस्था सदस्य श्री जयंतराव जाधव, माजी प्राचार्य के.डी. पवार सर ,श्री जे. टी .जाधव सर ,श्री अशोक वळवी, श्री सुधाकर माने, सौ.लाड , सौ. देशमुख, सौ स्नेहल जाधव ,सौ पाटील मॅडम, सौ हेमलता फडतरे ,सुभेदार मानसिंग सावंत ,माजी सरपंच बाळासाहेब जाधव, श्री बोटे ,श्री गोविंद तारळकर , श्री व्ही .जे. जाधव, श्री वायदंडे, कु. सारिका गुरव त्याचप्रमाणे पालक ,ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुभाष आगाशे यांनी पुढील विचार मांडले."शिक्षणाबरोबर संस्काराची जाणीव ठेवावी. थोरामोठ्यांची चरित्र व्याख्याने नेहमीच ऊर्जा देणारी ठरत असतात. त्यातील सकारात्मक बाजू घेऊन आयुष्य यशस्वी घडवावे "
प्राचार्य श्री डी . एन . गोफणे यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक आर .एन. जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली .संस्था विश्वस्त श्री एस .आर .पाटील यांनी संस्था मनोगतात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्था अध्यक्ष डॉक्टर सुरेशरावजी जाधव ,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव ,सचिव श्री मोहनराव जाधव यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या . मठाधिपती परमपूज्य श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज यांनी कार्यक्रमास आशीर्वाद दिले .निवृत्त प्रा. सौ. शकुंतला शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवृत्त सुभेदार श्री मानसिंग सावंत यांनी शाळेत रोख 25 हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य ए .डी.जाधव सर यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री बनकर एस. के. व श्री जाधव एस .जी.यांना तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री सूर्यकांत लावंड यांना प्राप्त झाला.
शाळेतील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध पारितोषिके देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यातकरण्यात आले.सौ. माधुरी चव्हाण , सौ स्वाती बर्गे ,सौ अमृता जाधव, सौ स्नेहल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष श्री एस. जी. जाधव यांनी आभार मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्होकेशनल विभाग प्रमूख प्रा . जे. बी. कार्याध्यक्ष प्रा. एस. बी .चव्हाण, सौ डी .व्ही. लावंड, श्री बनकर एस .के.श्री जाधव एस. जी .यांचे विशेष योगदान लाभले.





Social Plugin