बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेजने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये उत्तुंग यश मिळविले. कुमारी पूर्वा सुभाष राऊत हिने परीक्षेमध्ये 100 पैकी 98 गुण प्राप्त करून ती राज्यामध्ये प्रथम आली आहे. तर वैष्णवी शंकर शिंदे हिला 94 गुण व समिक्षा सचिन जगदाळे हिला 92 गुण प्राप्त झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव तसेच सर्व संस्था पदाधिकारी, कॉलेजचे प्राचार्य श्री गोफणे डी. एन., पर्यवेक्षक जाधव आर.एन., व्होकेशनल विभागाचे प्रमुख श्री जाधव जे.बी. त्याचबरोबर गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे सर्व अधिकारी, सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापिका सौ. स्वाती बर्गे व प्राध्यापिका सौ. देशमुख प्रियांका यांनी मार्गदर्शन केले.





Social Plugin