अतुल सावे नांदेड, संजय सिरसाट संभाजीनगर तर मेघना बोर्डीकर परभरणीला
मयुर वाव्हळ/प्रतिनिधी
सुमारे महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज शनिवारी (ता. १८) पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.जालन्याचे पालकमंत्रीपद पंकजाताई मुंढे यांच्याकडे देण्यात आले असून, वादग्रस्त बीडचे पालकमंत्रीपदमागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.राज्यपालांच्या आदेशान्वये शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी आज ३७ जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपुर आणि
अमरावती जिल्हा देण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे अहिल्यानगर, हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम, चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली, गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक, गणेश नाईक यांच्याकडे पालघर, गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ देण्यात आला आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणुन अॅड. आशिष शेलार यांची तर सहपालकमंत्री म्हणुन मंगलप्रभात लोढा, रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, चंद्रपुर डॉ. अशोक उईके, सातारा शंभुराज देसाई, रायगड कु. आदिती तटकरे, लातूर शिवेंद्रराजे भोसले, नंदुरबार अॅड. माणिकराव कोकाटे, सोलापुर जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवाळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलढाणा मकरंद जाधव, सिंधुदूर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुंडकर, गोंदिया बाबासाहेब पाटील तर कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणुन प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री म्हणून श्रीमती माधुरी
मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गडचिरोलीचे सहपालकमंत्री म्हणुन अॅड. आशिष जयस्वाल, वर्धा डॉ. पंकज भोयर आणि परभणीच्या पालकमंत्री म्हणुन श्रीमती मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





Social Plugin