सुंदरगिरी महाराज यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ
पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]
पुसेगाव (ता. खटाव) येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव पोलीस, समाजातील दानशूर व्यक्ती आणि व्यापारी यांच्या माध्यमातून सेवागिरी महाराजांची ही सुवर्णनगरी आज सीसीटीव्हीच्या कक्षेत आली.
पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पुसेगाव पोलीस ठाण्याच्या सलोखा सभागृहात याबाबत चर्चा झाली होती. यावेळी ट्रस्ट, ग्रामपंचायत व्यापारी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गावातील मुख्य बाजारपेठ, अंतर्गत रस्ते, विविध ठिकाणचे चौक वः दवाखान्यासारख्या अन्य परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी पुसेगावातील विविध ठिकाणी सुमारे
२० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मुख्य बाजारपेठेत अगोदरपासूनच असे बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच, त्यात आता वाढ झाल्याने बऱ्याच गोष्टींना आळा बसणार आहे.याचे प्रक्षेपण थेट पोलीस ठाण्यातच होणार असल्याने अनेक घटना, गुन्हे, चोरी, वाहतूक कोंडी घडल्यास त्याचा तात्काळ सोक्षमोक्ष लावता येणार आहे.
देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प. पः. सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, माजी चेअरमन रणधीर जाधव, संतोष वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, सरपंच घनशाम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजीराव लाटे बाळासाहेब जाधव , प्रवीण जाधव यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्गे, उपनिरीक्षक सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे ,पोलिस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin