Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वर येथे डॉ. अतुल खेरडे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर (दि. 30 मार्च 2026) – नांदगाव खंडेश्वर पशुचिकित्सालय येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन मा. श्री डॉ. अतुल जनार्दन खेरडे यांच्या सेवापूर्ती निमित्त गौरव समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉ. खेरडे यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात तब्बल 35 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावताना नांदगाव खंडेश्वर येथे सलग पाच वर्षे कार्य केले. त्यांच्या अनुभवसंपन्न सेवेमुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरणही पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री डॉ. उदयजी देशमुख होते. तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये मा. श्री डॉ. राऊत साहेब (विस्तार अधिकारी), मा. श्री डॉ. वैभव देशमुख, मा. श्री डॉ. गजानन नागरे, डॉ. गावंडे, डॉ. निरंजन डांगे, डॉ. गजानन चांदणे, डॉ. सचिन भडके, श्री व्ही. बी. राठोड, श्री पंकज पवार, डॉ. बावणे, डॉ. गाडगे, डॉ. विजय आखरे, श्री मेहेरे, डॉ. बाभुळकर, श्री अनिल भाऊ घवळे, श्री राहुल घोलप, डॉ. तायडे, श्री ज्ञानेश्वर कळंबे, श्री पाटेकर, चेतन राठोड, गणेश चौधरी, राहील शेख आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय, कार्यक्षेत्रातील पशुपालकांपैकी श्री पांडुजी ढवळे, श्री अमोल सवटे, श्री श्याम कणसे, श्री रवींद्र काकडे, श्री बाळकृष्णजी फुके, श्री नरेश ठाकरे, श्री तांबस्कर, श्री गोपाल चव्हाळे तसेच इतर अनेक पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.