प्रतिनिधी @ समाधान भुतेकर ईसरूळ
युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा देताच....कर्तव्यदक्ष आगारप्रमुख संतोष जोगदंडे यांनी कार्य तत्परता दाखवत दोघांना केले निलंबित....दिनांक 1/1/ 2025 रोजी च्या संध्याकाळी नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी अतिशय विचित्र आणि निर्लज्जपणाचा कळस गाठत आपला निष्क्रियपणा चिखली आगार च्या वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांनी व जबाबदार असणाऱ्या काही तेथील त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिला नेहमीप्रमाणे नियमानुसार रात्री आठ वाजता चिखली इसरूळ बस ही इसरूळ येथे मुक्कामी जाते त्या बस मध्ये फक्त इसरूळ चेच प्रवासी नसून मलगी देऊळगाव घुबे मिसळवाडी पिंपळवाडी मंगरूळ व शेवट इसरूळ व इतरही अनेक गावचे प्रवासी संध्याकाळी या गाडीने घराकडे जात असतात या गाडीच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय प्रवाशांसमोर नसतो
कारण दहा पाच मिनिट उशिरा हो किंवा वेळेवर हो गाडी जाणार हे सर्वांना माहीत असल्यामुळे सर्व प्रवासी त्या ठिकाणी हजर होतात परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक प्रवासी बस स्टॅन्ड मध्ये हजर असताना नियोजित वेळेपेक्षा गाडीला उशीर होत असल्यामुळे प्रवासी वाहतूक नियंत्रकाकडे जात होते व केविलवाणे आवाजात साहेबांना विचारत होते की साहेब गाडी केव्हा जाणार परंतु साहेबाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता गाडी फेल झाली आहे आमच्याकडे माणसं नाही तुमचं दररोजच आहे गाडी येईल तेंव्हा माणसं येईल तेव्हा पाठवू असे म्हणत मनात तब्बल अकरा वाजेपर्यंत त्यांनी गाडीचं लावली नाही प्रवाशांमध्ये अनेक वृद्ध होते किशोरवयीन मुली, महिला अनेक तरुण होते अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांची जी अवस्था झाली ती अतिशय बिकट होती त्यामध्येच प्रवाशांनी चिवडा आणून प्रत्येकांना चिवडा वाटला व आलिया भोगासी!!असे म्हणत अन्याय सहन केला महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक ठिकाणी अनेक प्रकरण बलात्कार, अपहरण, खून, चोरी अशा गोष्टी घडत आहेत महाराष्ट्र या सर्व प्रकरणाच्या बाबतीमध्ये धगधग पेटतो आहे अशा परिस्थितीत या ठिकाणी आगार नियंत्रकाने प्रवाशांच्या बाबतीमध्ये केलेला निष्काळजीपणा वेळेवर एखादी गाडी अड्जस्ट न करणे आगार प्रमुखाशी संपर्क न करणे हात जोडून विनंती करणाऱ्या प्रवाशांना गाडीची व्यवस्था न करून देणे हे अशाच कुठल्यातरी प्रकाराला निमंत्रण देण्यासारखे आहे.
माणुसकी हा विषयच आगार नियंत्राकाकडे दिसत नव्हता त्याच्यासोबत असणारे सहकारी सुद्धा मजा पाहत होते आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे त्या ठिकाणी हजर नव्हते त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या लोकांनी व्यवस्थित काम करायला नको का शिवाय या लोकांचे हे बेजबाबदारीचे वागणे नेहमीचच आहे अशा या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यांना तात्काळ निलंबित करावे जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही अन्यथा आपण प्रशासनाचे विरोधात तेव्हा आंदोलन छेडू अशा आशयाचा इशारा संतोष भुतेकर यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी आगार प्रमुख संतोष जोगदंडे यांना दिला इशारा तक्रार प्राप्त होताच व संतोष भुतेकर यांचा राग आक्रमक पवित्र पाहता कर्तव्यदक्ष आगार प्रमुख संतोषजी जोगदंडे साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा असे होऊ नये ची काळजी घेऊन संबंधित दोन अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले व इतर जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई साठी पाऊल उचलले... संतोष भुतेकर यांनी आगार प्रमुख यांचे मनापासून आभार मानले हे विशेष





Social Plugin