Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी यात्रेतील श्वान शर्यतीत बस्तीसशिराळाच्या सागर पाटील यांचा ज्युनिअर ऐनर्जी श्वान प्रथम क्रमांकाचा मानकरी



 बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

                    

                     श्री सेवगिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव ता खटाव येथे आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय श्वान शर्यतीत बत्तीस शिराळाच्या सागर पाटील   यांचा ज्युनिअर ऐनर्जी  या श्वानाने प्रथम क्रमांक पटकविला तर उपविजेतेपद लेंगरे ता .विटा येथील संकेत सावंत यांच्या मालकिची काळी पांढरी रंगाची मादी स्मार्ट गर्लने पटकावले . या श्वान शर्यतीत २६६ श्वानांनी सहभाग घेतला होता .

               शासकीय विद्यानिकेतन शेजारी सातारा दहिवडी रस्त्यालगत झालेल्या यास्पर्धेत सातारा सोलापूर,सांगली,या भागातील श्वानांनी सहभाग घेतला, रात्री उशिरापर्यंत

अत्यंत अटातट्टीच्या  लढती झाल्या . श्वान शर्यतीचा शुभारंभ मठाधिपती प .पू. सुंदरगिरी महाराज , चेअरमन  डॉ . सुरेश जाधव , विश्वस्त रणधीर जाधव , बाळासाहेब जाधव , संतोष वाघ , सचिन देशमुख यांच्या उपस्थितीत झाला . या स्पर्धेत अनुक्रमे विजयी श्वान व त्याचे मालक पुढील प्रमाणे

३ स्वप्नील जाधव ( आग्नी )

४ सुरेश वाडकर ( मटका )

५ -शंकर वलेकर (हिल कॅट )

६ -तेजस पोळ शामगाव ( स्केच )

७   चेतन धनवडे ( सरदार )

८ संकेत जंगम ( शिवकन्या )

९ आमिन फौजी चिंचणेर ( कृष्णराज )

१० धाकस पाटील रेसिंग क्लब ( पाटील )

 अजिंक्य महाजन,चितळी ,अनीकेत डुबल,सुरज पुजारी,कराड, अमोल गावडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

          सर्व विजेत्या  श्वान मालकांना सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प पु सुंदरगिरी महाराज,चेअरमन रणधीर जाधव,विश्वस्त डॉ सुरेश जाधव,बाळासाहेब जाधव,संतोष वाघ,  हरणाई सुतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख , सपोनि संदिप पोमण , बाळासाहेब जाधव , मदन जाधव  ग्रामस्थ यांच्या हस्ते बक्षीस  देण्यात आले., छायाचित्र - पुसेगाव . श्वान स्पर्धतील विजेत्यांना बक्षिस देताना रणजितसिंह देशमुख , चेअरमन डॉ . सुरेश जाधव , रणधीर जाधव , बाळासाहेब जाधव , संतोष वाघ , सपोनि संदीप पोमण व इतर  छाया - प्रकाश राजेघाटगे बुध