Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी हरित मार्गाला धग विघ्नसंतोषींच्या आगीची !



            असंख्य झाडे जळाली : संरक्षक जाळ्याही गायब झाल्याने संताप व्यक्त

 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून निढळ ते वर्धनगड १२ किलोमीटरचा आणि पुसेगावच्या मुख्य बाजारपेठेतून जाणारा सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग हरित करण्याच्या उद्देशाने देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याच्या दुतर्फा हजारो वृक्षांची लागवड करून संरक्षक जाळी बसवली आहे. मात्र, शेतात लावलेल्या आगीमुळे झाडे जळून खाक झाली, तर काही ठिकाणचे संरक्षक जाळ्याही चोरीस गेल्या आहेत.

दरम्यान, श्री सेवागिरी महाराजांच्या पुसेगावनगरीतून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वृक्षछायेचा लाभ मिळावा या उद्देशाने पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केली आहे.

सातारा-लातूर या महामार्गावरील वर्धनगड-पुसेगाव-निढळ दरम्यान दुतर्फा पाच हजारांहून अधिक सांवली देणाऱ्या वृक्ष लागवडीचा उपक्रम येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, वारकरी संप्रदाय व सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. यामध्ये वड, पिंपळ, करंज, आदींसह सावली देणाऱ्या वृक्षांची लागवडरस्त्याच्या दुतर्फा करण्यात येत आहे. चरायला येणारी जनावरे तसेच अन्य माध्यमातून, लावलेल्या झाडांची जोपासना व्हावी म्हणून सर्वच झाडांना संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. तसेच झार्डाना टँकरच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र,

वर्धनगड परिसरात रस्त्यालगत असलेल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उसाचे पाचट पेटवले. ही आग पसरत गेल्याने रस्त्यालगतची लावलेली झाडे जळून खाक झाली, तर आसपासच्या परिसरातील झाडांची संरक्षक जाळीच चोरट्यांनी लंपास केली आहे.         

                                सर्वच शेतकऱ्यांनी वृक्षांची निगा राखावी

 वाढते औद्योगीकरण आणि प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. सातारा-लातूर रस्त्याच्या कामामुळे दुतर्फा असलेली कित्येक वर्षांची अनेक झाडे नष्ट झाली. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे जतन ही काळाची गरज झाली आहे. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हरित मार्गाचे पाऊल उचलले आहे.  रस्त्यालगतच्या सर्वच शेतकऱ्यांनी या वृक्षांची निगा राखावी व जोपासना करावी हीच महाराजांच्या चरणी खरी आदरांजली ठरेल.