राजकुमार चिंचोळकर बाळापूर
तालुक्यातील सध्याच्या परिस्थितीत नदी पात्रात असलेले कोल्हापूरी बंधारे ओसंडून वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर नदी पात्रातून शेतकऱ्यांचा जुगाडाच्या साहाय्याने नदी पात्र पार करावे लागत आहे या वर्षी पाउसाचे प्रमाण जास्त राहीले आहे. तर कोल्हापूरी बंधाऱ्याची फाटके नियोजित वेळेत बंद करून बंधाऱ्यात पाणी अडविले गेले वरुन वाहनारा नदी चा प्रवाह बऱ्यापैकी असल्याने सध्याच्या परिस्थितीत कोल्हापूरी बंधारे शंभर टक्के क्षमतेने भरलेले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परीसरातील सिंचन विहीर तसेच कुपनलिका यांच्यातील जलसाठा कायम राहत असल्याने बागाईत श्रेत्राकरीता लाभदायक ठरत असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच वाडेगाव येथील निगूर्णा नदीपात्रातील कोल्हापूरी बंधारा आजमितीला शंभर टक्के भरल्याने ओसंडून वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तर मागील जवळपास दोन महिन्यांपूर्वी बंधाऱ्याचे गेट अज्ञाताकडुन काढून बाजूला ठेवल्यामुळे त्यावेळी बंधारा जवळपास पन्नास टक्के रिकामा झाला होता बंधाऱ्याचे गेट काढल्याची माहिती गावात पसरताच परत अज्ञाता कडून काढून ठेवलेले गेट बसविले त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत बंधारा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे वाडेगासह परिसरातील गावातील पाणी टंचाईवर मात होण्यासाठी बंधारा बहुउपयोगी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. तर नदी काठालगत असलेल्या बागायतदार शेतकरी बांधवांचा रस्ता नदी पात्रातून असल्याने संमधीत शेतकरी बांधवांना दैनंदिन नदीपात्रातुन येजा करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असली तरी बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे बागाईत श्रेत्राकरीता उपयोगी ठरत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर नदी पात्रात भरपूर पाणी असल्याने संमधीत शेतकरी बांधवांनी जुगाड तयार करून जुगाडा वरुन नदी पात्रातून प्रवास करीत असल्याचे चित्र समोर आले आहे तर बंधाऱ्यात पाणी अडविले असता नदी पात्रातून सुरक्षीत येजा करण्यासाठी संमधीत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोल्हापूरी बंधाऱ्याची साफसफाई करण्यात येवून बंधाऱ्याचे गेट बसवून ताडपत्री लावून पाणी अडविले गेले त्यावेळी सध्याच्या परिस्थितीत बंधारा शंभर टक्के भरल्याने पाणी टंचाई बाबतीत दिलासा मिळेल.तसेच परिसरातील शेतकरी बांधवांना उपयोगी ठरेल.--सुनील मानकर नागरीक
बंधाऱ्यात पाणी अडविले असल्याने नदी पात्रातून प्रवास करणे कठीण झाले आहे. अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे बागायतदार शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळात आहे. तरी जागेश्वर मंदिर परिसरात नदी पात्रात पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.--प्रविण लोखंडे बागायतदार शेतकरी
• Scanned by Gmail





Social Plugin