अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले असून या योजनेचा लाभ आता एकाच कुटुंबातील फक्त एक सदस्यालाच मिळणार आहे. याअंतर्गत पती-पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी फक्त एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच, अर्ज करताना आधारकार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. २०१९ पूर्वी जमीन खरेदी केलेल्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पेन्शनधारक, आणि आयकर भरणाऱ्यांना या योजनेच्या लाभातून वगळले जाणार आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील अनेकांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून डिसेंबर २०१८ मध्ये पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. सुरुवातीला एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींनी योजनेचा लाभ घेतला होता, परंतु आता नवीन नियमांमुळे कुटुंबातील एकालाच हा लाभ मिळणार आहे. नवीन नियमावलीनुसार लाभार्थीच्या नावावर २०१९ पूर्वी जमिनीची नोंद असणे आवश्यक आहे, तसेच २०१९ नंतर जमीन खरेदी, खातेफोड, बक्षीसपत्र असल्यास लाभ मिळणार नाही, परंतु वारसा हक्काने जमीन मिळाल्यास 'लाभ दिला जाईल. कुटुंबातील एकच सदस्य या योजनेसाठी पात्र राहणार आहे. तसेच सरकारी, निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पेन्शनर, तसेच आयकर भरणारे यांना लाभ मिळणार नाही. ई-केवायसीची आवश्यकता आणि शेतकऱ्यांची नाराजी. शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरल्यानंतर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. परंतु, शेतकऱ्यांना वारंवार ई-केवायसी करण्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. केंद्र सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. घनसावंगी तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांची यादी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. जे शेतकरी पात्र असूनही अपात्र ठरले आहेत, त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
%20(2).jpeg)




Social Plugin