प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर
म.पिर---आज दिनांक 18/01/25 ग्राम गावडे तीन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयडॉल शेतकरी शेतीनिष्ठ रविंद्र गायकवाड यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पाला वाशिम जिल्ह्यातील नामांकित शाळा कारंजा लाड येथील आर.जे. चौरे हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची सहल आज थेट शेतकऱ्याच्या बांधावर नेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बायो इनपुट निर्मिती प्रयोगशाळा मधील विविध बायो इनपुट यामध्ये ट्रायकोडर्मा निर्मिती ,पीएसबी, मायक्रोरायजाची निर्मिती, सुडोनोमास, रायझोबियम, केएसबी, शेतीला पूरक व्यवसाय गांडूळ खत निर्मिती गांडूळाचे कार्य गांडुळाची उत्पत्ती गांडूळाच्या विविध जाती गांडूळाची निगा आणि काळजी गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र कसा आहे आधी विषय विद्यार्थ्यांनी समजून घेतले व रोज पैसे देणारी शेती संकल्पना समजून घेतली. रसायनाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम व नैसर्गिक मानवपूर्वरक शेती आणि रासायनिक शेती यामधील फरक विद्यार्थ्यांनी समजून घेतला व आपल्या आई-वडिलांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी वचन दिले यावेळी शाळेचे शिक्षक वृंद सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते





Social Plugin