प्रतिनिधी शौकत शेख
शेवगाव - शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील रहिवासी उत्तम भीमराव केस भट यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याने गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथे जाऊन त्यांनी दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी आत्महत्या केली होती त्यांच्या आई. मुलगा. मुलगी. पत्नी. असा परिवार आहे शासनाने तात्काळ दाखल घेऊन आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये शासकीय मदत मयत उत्तम भीमराव केस भट यांच्या पत्नीस सिंधुबाई उत्तम यांना दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी गेवराई चे तहसीलदार व गेवराईचे नवनिर्वाचित आमदार विजय सिंह पंडित यांच्या उपस्थितीत उत्तम भीमराव केस भट यांच्या पत्नीस शासनाकडून मिळालेल्या दहा लाख रुपये निधीचा चेक देण्यात आला तसेच या कुटुंबीयांना संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी भेट दिली समस्त गावकऱ्यांच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आभार मानले आहे तसेच मराठा संघटना तालुकाध्यक्ष हरिभाऊ केस भट व गावचे ज्येष्ठ नागरिक अंकुश अण्णा केस भट . हे उपस्थित होते





Social Plugin